वृत्तवेध
-
संजय बाबर यांची अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून बढती
कणकवली (संतोष नाईक):- सोलापूर प्रशिक्षण केंद्रातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि कणकवली पोलीस स्टेशनचे तात्कालीन पोलीस निरीक्षक संजय बाबर यांना नागपूर शहरात अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून बढती मिळाली आहे. त्यामुळे त्यांचे सर्वच थरातून कौतुक होत आहे. कणकवली पोलीस स्टेशनला पोलीस निरीक्षक म्हणून काम करताना संजय बाबर यांनी केलेले कार्य उल्लेखनीय होते. प्रेमळ स्वभावामुळे विविध क्षेत्रातील अनेक
-
अर्जुन पुरस्कार प्राप्त सिंधू कन्या हिमानी परब हिचा ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्यावतीने सत्कार
कसाल:- सर्वात युवा अर्जुन पुरस्कार विजेती; मल्लखांब खेळात अर्जुन पुरस्कार मिळवणारी देशातील पहिली खेळाडू हिमानी परब हिचा तिच्या सिंधुदुर्गातील कसाल येथील निवासस्थानी जाऊन ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्यावतीने सत्कार करण्यात आला. तिच्या उतुंग यशाबद्दल ह्यूमन राईटच्यावतीने सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान केला. त्यावेळी ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे जिल्हाध्यक्ष संतोष नाईक, जिल्हा निरीक्षक मनोज
-
शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम आठ दिवसात जमा करा
विम्याचे पैसे न दिल्यास विमा कंपन्यांवर गुन्हे दाखल करणार- कृषिमंत्री दादाजी भुसे मुंबई, दि. 2:- खरीप 2020 च्या हंगामात नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या विम्याच्या प्रलंबित प्रस्तावांवर तातडीने कार्यवाही करुन येत्या आठ दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर विम्याची रक्कम जमा करण्याचे निर्देश कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी दिले. शेतकऱ्यांच्या विम्याच्या प्रश्नावर शासन अतिशय गंभीर
-
आजअखेर ५१ हजार ६८४ रुग्ण कोरोनामुक्त सक्रीय रुग्णांची संख्या ५३
सिंधुदुर्गनगरी, दि. २ (जि.मा.का):- जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ५१ हजार ६८४ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ५३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी ७ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्ण दि. 02/12/2021 ( दुपारी 12 वाजेपर्यंत ) 1 आजचे नवीन पॉझिटिव्ह रुग्ण 7
-
असलदे सोसायटीची बिनविरोध निवडणूक- राजकीय पक्षांचा पराभव?
कणकवली (प्रतिनिधी):- तालुक्यातील असलदे गावात पाच वर्षांपूर्वी झालेली सोसायटीची निवडणूक अद्यापही स्मरणात असताना यावेळी मात्र सोसायटीची बिनविरोध निवडणूक झाली असून राजकीय पक्षांचा पराभव झाला आहे, अशी प्रतिक्रिया गावातील ग्रामस्थांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली आहे. असलदे सोसायटीच्या १३ जागांसाठी १३ उमेदवारी अर्ज प्राप्त झाले होते. त्यामुळे निवडणूक बिनविरोध झाली. गावाचे राजकीय वातावरण खेळीमेळीचे राहिले. असे चित्र
-
समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई यांच्यावतीने शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम संपन्न
रत्नागिरी:- समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई यांच्यावतीने नुकताच विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम श्री सिद्धिविनायक विद्या मंदिर, अनसुरे (ता. राजापूर, जि. रत्नागिरी) येथे संपन्न झाला. समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई ही सामाजिक संस्था सातत्याने गेली १५ वर्षे कोकणातील विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी लागणाऱ्या विविध शैक्षणिक साहित्याचे वाटप करीत असते. `शैक्षणिक उपक्रम २०२१’ च्या माध्यमातून संस्थेचे संस्थापक श्री योगेश
-
कोरोनामुळे पालक गमावलेल्या मुलांची व विधवांची नोंदणी होणार
वारस नोंदणीसाठी विधवा तसेच पालक गमावलेल्या मुलांची गावनिहाय यादी द्यावी ! – निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड सिंधुदुर्गनगरी, दि. 29 (जि.मा.का.) – कोरोनामुळे पालक गमावलेल्या मुलांबाबत तसेच विधवांचे वारस नोंदणीसाठी गाव निहाय, तालुका निहाय यादी द्यावी. तहसिलदारांच्या माध्यमातून वारस नोंद केली जाईल, अशी सूचना निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड यांनी केली. कोविड 19 रोगाच्या पार्श्वभूमीवर बालकांच्या काळजी
-
सिंधुदुर्गनगरीमध्ये डाक अदालत
सिंधुदुर्गनगरी,दि.29 (जि.मा.का) दिनांक 10 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 11 वाजता अधीक्षक डाकघर सिंधुदुर्ग यांचे कार्यालयामध्ये डाक अदालतीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती अधीक्षक डाकघर सिंधुदुर्ग विभागाचे आ.ब. कोड्डा यांनी दिली आहे. पोस्टाच्या सेवेविषयी किंवा कामकाजाबद्दल ज्या तक्रारींचे निवारण सहा आठवड्याच्या आत झालेले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा तक्रारींची या डाक अदालतध्ये दखल घेतली जाईल. विशेषत: टपाल,स्पीड पोस्ट काऊटर सेवा, डाक वस्तू,पार्सल,
-
कुडाळ, वाभवे – वैभववाडी, कसई – दोडामार्ग आणि देवगड – जामसंडे- नगर पंचायत निवडणूक कार्याक्रम जाहीर
सिंधुदुर्गनगरी, दि. 29 (जि.मा.का.) – राज्य निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील कुडाळ, वाभवे – वैभववाडी, कसई – दोडामार्ग आणि देवगड – जामसंडे या नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार या चार नगरपंचायतीच्या क्षेत्रामध्ये आचारसंहिता लागू झाली असून ती निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत राहणार आहे. या निवडणूक क्षेत्रातील मतदारांवर विपरित प्रभाव टाकणारी कोणतीही कृती/घोषणा कोणत्याही मंत्री, खासदार,
-
सिंधुदुर्गातील कोरोना प्रतिबंधक लसीकरण- आकडेवारी निराशजनक
१७०० हेल्थ वर्कर आणि ६० वर्षावरील ४३ हजार व्यक्तींना अद्यापी दुसरी मात्र नाही! सिंधुदुर्गनगरी, दि. 26:- जिल्ह्यात वाढत्या कोरोना संसर्गामुळे प्रशासनाने लसीकरणावर भर दिला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 5 लाख 40 हजार 176 नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. यामध्ये एकूण 9 हजार 855 हेल्थ वर्करनी पहिला डोस तर 8 हजार 156 जणांनी दुसरा डोस घेतला.



