वृत्तवेध
-
पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी विलीन!
पुणे:- महाराष्ट्र भूषण, पद्मविभूषण, इतिहास संशोधक, ओजस्वी वाणीने शिवचरित्र घराघरांत पोहोचविणारे, ‘राजा शिवछत्रपती’ या ग्रंथाचे लेखक, ‘जाणता राजा’ या महानाटय़ाचे लेखक-दिग्दर्शक, शिवभक्त शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे सोमवारी पहाटे ५ वाजून ७ मिनिटांनी निधन झाल्याची माहिती दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाच्या प्रशासनाने दिली आहे. बाबासाहेबांवर मागील काही दिवसांपासून उपचार सुरु होते. ते १०० वर्षांचे होते. मागील काही दिवसांपासून
-
राज्यपालांच्या हस्ते अतुल परचुरे यांना गंधार गौरव पुरस्कार प्रदान; उषा नाडकर्णी जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित
संगीतकार ओंकार घैसास, दिग्दर्शक जयंत पवार, अनुश्री फडणीस, प्रकाश पारखी गंधार युवा गौरव पुरस्काराने सन्मानित मुंबई:- लहान मुलांना संस्कार देण्याचे स्थायी कार्य कुटुंब, समाज व सांस्कृतिक संस्थांकडून होत असते. या संस्कारांच्या माध्यमातून समाज घडतो व समाजाच्या माध्यमातून राष्ट्र निर्माणाचे कार्य होते, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले. बालदिनाचे औचित्य साधून बालरंगभूमीसाठी कार्य
-
राज्यात ऑक्टोबरमध्ये १९ हजार ६४८ बेरोजगारांना रोजगार
मुंबई:- कोरोनाच्या संकटामुळे बेरोजगारीची समस्या निर्माण झाली असताना कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांद्वारे राज्यात विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग यांमध्ये ऑक्टोबर २०२१ मध्ये १९ हजार ६४८ बेरोजगार उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात आला असल्याची माहिती या विभागाचे मंत्री नवाब मलिक यांनी दिली. महास्वयंम वेबपोर्टल, ऑनलाईन रोजगार मेळावे आदी विविध उपक्रमांद्वारे
-
आदिवासींशी एकरूप होऊन त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न व्हावे
एकल श्रीहरी समितीचा रौप्य महोत्सवी कार्यक्रम राज्यपालांच्या उपस्थितीत संपन्न मुंबई:- आदिवासी समाज आजही कठीण परिस्थितीत राहत आहे. त्यामुळे आदिवासींच्या केवळ सामाजिक व सांस्कृतिक उत्थानासाठी प्रयत्न न करता त्यांच्यासह एकरूप होऊन त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि विशेषतः आर्थिक विकासासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी येथे केले. आदिवासींच्या सामाजिक सांस्कृतिक उन्नतीसाठी कार्य
-
पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम संपन्न
पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन मुंबई:- स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस मंत्रालयात शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जयंती आणि बाल दिनानिमित्त विधान भवनात अभिवादन मुंबई:-
-
आंतरराष्ट्रीय स्तरावर पर्यावरण संवर्धनाकरिता महाराष्ट्राला मानाचा पुरस्कार
पर्यावरण संवर्धनाच्या महाराष्ट्राच्या प्रयत्नांची संयुक्त राष्ट्र हवामान बदल परिषदेकडून दखल मुंबई:- पर्यावरण संवर्धनाच्या महाराष्ट्राच्या प्रयत्नांची संयुक्त राष्ट्र हवामान बदल परिषदेकडून दखल घेतली गेली आहे. स्कॉटलंड येथे सुरू असलेल्या COP26 कॉन्फरन्समध्ये महाराष्ट्राला ‘इन्स्पायरिंग रिजनल लीडरशिप’ (प्रेरणादायी प्रादेशिक नेतृत्व) साठी पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार महाराष्ट्रातील जनतेला व देशाच्या पर्यावरण संवर्धन ध्येयास समर्पित करतो, अशी प्रतिक्रिया राज्याचे
-
पालखी महामार्गाच्या दोन्ही बाजूला वारकऱ्यांसाठी सुविधा निर्माण कराव्यात – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
पालखी महामार्गावर वारकऱ्यांसाठी सुविधा निर्माण करण्यात राज्य शासन कमतरता राहू देणार नाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंढरपूर:- संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम पालखी महामार्गाची लांबी अनुक्रमे २३१ व १३० किलोमीटर इतकी असून यासाठी एकूण १२ हजार कोटीच्या निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. या दोन्ही पालखी महामार्गाच्या बाजूला पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी विशेष मार्ग तयार करावा व
-
महाराष्ट्रातील दहा मान्यवरांचा पद्म पुरस्काराने सन्मान
उद्योजक आनंद महिंद्रा यांना पद्म भूषण नवी दिल्ली:- सर्वोच्च नागरी पद्म पुरस्कारांचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राष्ट्रपती भवन येथे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील १० मान्यवरांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामध्ये उद्योजक आनंद महिंद्रा यांना पद्म भुषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पद्म पुरस्कार वितरण सोहळयास उपराष्ट्रपती एम. वैंकय्या नायडु, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी,
-
अ. भा. मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. शशिकांतजी पवार यांचे नाशिक येथे भव्य स्वागत!
नाशिक- अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. शशिकांतजी पवार यांचे नाशिक पुण्यनगरीत स्वागत स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी केले. या दौऱ्यात अखिल भारतीय मराठा महासंघाचे कार्य अधिक गतिमान करण्यासाठी तळागाळातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. शशिकांतजी पवार करणार आहेत. त्यांच्या नाशिक भेटीने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
-
शेतकरी महिला उत्पादक कंपन्यांची गरूडभरारी वाखाणण्याजोगी
मुंबई, दि. २७:- गडचिरोली, यवतमाळ, वर्धा तसेच राज्याच्या इतर जिल्ह्यांतील महिलांनी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत शेतीवर आधारित उत्पादक कंपन्या तयार करून जी गरूडभरारी घेतली ती वाखाणण्याजोगी आहे. महिलांनी या माध्यमातून शेती उत्पादनांसाठी ब्रँडींग, पँकेजिंग आणि ॲमेझॉन प्लॅटफार्मवर आपले उत्पादक आणण्याचा निर्णय घेऊन त्याद्वारे प्रगती साधल्याचा मला आनंद होत आहे. महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी शासन त्यांच्या
