वृत्तवेध
-
पर्यटकांच्या स्वागतासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ सज्ज
मुंबई, दि. १२: कोरोनाचा प्रभाव कमी होत असल्यामुळे शासनाने जवळपास सर्वच पर्यटनस्थळे खुली करून पर्यटकांना दिलासा दिला आहे. पर्यटक देखील हिवाळी पर्यटन हंगामासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या पर्यटक निवासाचे आरक्षण करून पर्यटनाचे नियोजन करू लागल्याचे दिसून येत आहे. गुलाबी थंडीची चाहूल आणि दीपावलीच्या सुटीचे वेध लागले असल्याने पर्यटकांची पावले पर्यटन स्थळांकडे वळू लागली असल्याने महामंडळानेही
-
समीर सहाय यांनी घेतली राज्य माहिती आयुक्त पदाची शपथ
मुंबई, दि. 12: श्री. समीर सहाय यांना राज्य मुख्य माहिती आयुक्त सुमित मल्लिक यांनी राज्य माहिती आयुक्त पदाची शपथ दिली. राज्य मुख्य माहिती आयुक्त यांच्या दालनात शपथविधी समारंभ झाला. राज्य शासनाने राज्य माहिती आयुक्त या पदावर श्री.समीर सहाय यांची नियुक्ती केली आहे. त्यांच्याकडे राज्य माहिती आयुक्त, पुणे खंडपीठ या पदाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे.
-
महाराष्ट्रात सप्टेंबरमध्ये १७ हजार १५० बेरोजगारांना रोजगार
मुंबई, दि. १२: कोरोनाच्या संकटामुळे बेरोजगारीची समस्या निर्माण झाली असताना कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांद्वारे राज्यात विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग यांमध्ये सप्टेंबर २०२१ मध्ये १७ हजार १५० बेरोजगार उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात आला असल्याची माहिती या विभागाचे मंत्री नवाब मलिक यांनी दिली. महास्वयंम वेबपोर्टल, ऑनलाईन रोजगार मेळावे आदी
-
मरीन ड्राईव्हवर उभे राहणार भव्य मराठी भाषा भवन
मुंबई, दि. १२: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर आज मरीन ड्राईव्ह येथे उभारण्यात येणाऱ्या मराठी भाषा भवन प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार व मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई उपस्थित होते. मराठी भाषा विभागातर्फे “मराठी भाषा भवन मुख्य केंद्र” प्रस्तावित आहे. इमारतीच्या बांधकामासाठी स्पर्धा घेऊन वास्तूविशारदाची निवड करण्यासाठी मागविण्यात आलेल्या निविदेंतर्गत वास्तूविशारदांनी आज सादरीकरण
-
प्रलंबित रस्ते प्रकल्पांना कालबद्ध रितीने मार्गी लावा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत राज्यातील रस्ते प्रकल्पांचा आढावा राज्यातील महामार्गांचे प्रकल्प वेगाने पूर्ण करण्यासाठी मंत्रालयातून नियमित आढावा घेण्यात येणार मुंबई- राज्यातील राष्ट्रीय तसेच राज्य महामार्गांचे प्रकल्प वेगाने पूर्ण करण्यासाठी या प्रकल्पांच्या कामांचा मंत्रालयातून नियमित आढावा घेण्यात येणार आहे. भूसंपादन आणि वन विभागाशी संबंधित बाबींमुळे प्रलंबित असलेल्या प्रकल्पांचा लवकरच निर्णय
-
महाराष्ट्र प्राध्यापक सेनेच्या रत्नागिरी जिल्हा सचिवपदी प्रा. नितेश केळकर यांची नियुक्ती!
रत्नागिरी- महाराष्ट्र प्राध्यापक सेनेच्या रत्नागिरी जिल्हा सचिवपदी प्राध्यापक नितेश केळकर यांची नियुक्ती झाल्याने त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. अनेक मान्यवरांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख-उद्धव ठाकरे, पर्यावरण-वन व राजशिष्टाचार मंत्री शिवसेना युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, महाराष्ट्र प्राध्यापक सेनेचे मुख्य सल्लागार व युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या सल्ल्यानुसार महाराष्ट्र प्राध्यापक
-
कोकणच्या विकासाने भरारी घेतली, कोकणची संपन्नता जगासमोर येणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
सिंधुदुर्ग विमानतळाचे लोकार्पण; कोकणवासियांचे स्वप्न सत्यात उतरले! सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का.) – आजपासून सुरू झालेल्या सिंधुदुर्ग विमानतळामुळे कोकणवासियांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. खऱ्या अर्थाने कोकणच्या विकासाने आजपासून भरारी घेतली आहे. जगभरातील पर्यटक कोकणात येतील आणि कोकणची संपन्नता जगासमोर येणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. नागरी विमान वाहतूक मंत्रालय, महाराष्ट्र शासन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ
-
सोमवारपासून पुणे जिल्ह्यातील महाविद्यालये, विद्यापीठ आणि पर्यटनस्थळे सुरू होणार!
पुणे:- जिल्ह्यातील कोविड परिस्थितीत सुधारणा होत असून लसीकरणाचे प्रमाणदेखील चांगले असल्याने जिल्ह्यातील महाविद्यालये, विद्यापीठ आणि पर्यटनस्थळे सोमवारपासून सुरू करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या कोविड आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस खासदार गिरीश बापट, पुणे मनपा महापौर मुरलीधर मोहोळ, पिंपरी-चिंचवडच्या महापौर माई ढोरे, विभागीय आयुक्त सौरभ राव आदी उपस्थित
-
सिंधुदुर्ग जिल्ह्यात 4 लाख 83 हजार 866 जणांनी घेतला पहिला डोस
सिंधुदुर्गनगरी, दि. 8 (जि.मा.का.):- जिल्ह्यात वाढत्या कोरोना संसर्गामुळे प्रशासनाने लसीकरणावर भर दिला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 4 लाख 83 हजार 866 नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. यामध्ये एकूण 9 हजार 835 हेल्थ वर्करनी पहिला डोस तर 8 हजार 32 जणांनी दुसरा डोस घेतला. 9 हजार 916 फ्रंटलाईन वर्करनी पहिला डोस तर 8 हजार 667 जणांनी
-
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजअखेर 50 हजार 83 रुग्ण कोरोनामुक्त सक्रीय रुग्णांची संख्या 914
सिंधुदुर्गनगरी, दि. 8 (जि.मा.का): जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 50 हजार 83 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 914 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 61 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली. (खालील चार्ट पाहण्यासाठी मोबाइल आडवा (horizontal)


