वृत्तवेध
-
विधिमंडळ सदस्यांनी स्थानिक विकास निधीचा सुनियोजित वापर करावा! – संसदीय कार्य मंत्री अनिल परब
मुंबई (प्रतिनिधी):- विधिमंडळ सदस्यांनी स्थानिक विकास निधी अंतर्गत प्रामुख्याने शासनाच्या इतर जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय अथवा केंद्रीय योजनांमध्ये न बसणाऱ्या कामांचा आणि लोकांच्या गरजा तात्काळ पूर्ण होऊ शकतील अशी कामे यामध्ये समाविष्ट करावीत. स्थानिक विकास निधीचा सुनियोजित वापर करावा, असे संसदीय कार्य मंत्री ॲड. अनिल परब यांनी सांगितले. विधान भवन, मुंबई येथे महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयातील वि.स. पागे
-
ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मानवी हक्क कार्यशाळेस उत्स्फुर्त प्रतिसाद
मानवाचे नैसर्गिक आणि संविधानात्मक अधिकार मिळवून देण्यासाठी प्रामाणिकपणे कार्य केल्यास लोकशाही मजबूत होईल!” -ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष एम. डी. चौधरी कणकवली (विशेष प्रतिनिधी):- “विशेषतः समाजाच्या दुर्लक्षित घटकांवर होणारे अन्याय दूर करण्यासाठी अर्थात सर्वसामान्यांना मानवाचे नैसर्गिक आणि संविधानात्मक अधिकार मिळवून देण्यासाठी प्रत्येक नागरिकाने प्रामाणिकपणे कार्य केले पाहिजे. त्यातूनच खऱ्याअर्थाने लोकशाही मजबूत होईल!”
-
तळेरे विद्यालयासमोर महामार्गावरती पादचारी पुल उभारणीची सामाजिक कार्यकर्ते राजेश जाधव यांची मागणी!
वरिष्ठ स्तरावरील अधिकारी अनुकूल; मात्र खारेपाटण उपअभियंत्यांची कमालीची अनास्था! मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गालगत असणाऱ्या तळेरे येथील वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय आणि मुंबई विद्यापीठाच्या दळवी महाविद्यालयासमोर विद्यार्थ्यांना महामार्ग ओलांडून पलीकडे जाण्या-येण्यासाठी पादचारी पुल होणे अत्यंत गरजेचे आहे. अशा प्रकारची आग्रही मागणी आणि ठाम भूमिका सामाजिक कार्यकर्ते राजेश जाधव यांनी अगदी महामार्ग निर्मितीच्या प्रारंभीपासून लावून धरली
-
सिंधुदुर्ग जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे सायकल रॅली संपन्न
सिंधुदुर्गनगरी:– महात्मा गांधी जयंती निमित्त तसेच स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा विधी सेवा प्राधिकरणतर्फे आयोजित जिल्हा न्यायालय ते ओरोस फाटा सायकल रॅली संपन्न झाली. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश एस.वी. हांडे यांनी या रॅलीला हिरवा झेंडा दाखवून रॅलीची सुरुवात केली. यावेळी जिल्ह्या न्यायाधिश- 1 व अतिरिक्त सत्र न्यायाधिश आर.बी.रोटे, मुख्य न्यायदंडाधिकारी ए.एम.फडतरे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे
-
ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनची ३ ऑक्टोबरला कणकवली येथे मार्गदर्शनपर कार्यशाळा
ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे राष्ट्रीय पातळीवरील प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार! सिंधुदुर्ग (प्रतिनिधी):- ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनची ३ ऑक्टोबरला कणकवलीतील मातोश्री मंगल कार्यालय येथे सकाळी १० ते दुपारी २ दरम्यान मार्गदर्शनपर कार्यशाळा होणार असून त्यावेळी ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे राष्ट्रीय पातळीवरील प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. सिंधुदुर्गात अशाप्रकारची कार्यशाळा प्रथमच होत असून ह्युमन
-
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा
सिंधुदुर्गनगरी:- तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये 435.0950 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 97.26 टक्के भरले आहे. गेल्या चोवीस तासात या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 24.80 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील मध्यम व लघु पाटबंधारे प्रकल्पात पुढीलप्रमाणे पाणीसाठा असून सर्व आकडे द.ल.घ.मी. परिमाणात आहेत. देवघर- 84.9760, अरुणा- 78.2893, कोर्ले- सातंडी- 25.4740. लघु पाटबंधारे प्रकल्पातील पाणीसाठा पुढीलप्रमाणे आहे. शिवडाव– 2.6480, नाधवडे–
-
मालवण तालुक्यात सर्वाधिक 47 मि.मी. पाऊस
सिंधुदुर्गनगरी:– जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात मालवण तालुक्यात सर्वाधिक 47 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 29.875 मि.मी. पाऊस झाला असून 1 जूनपासून आतापर्यंत एकूण सरासरी 3879.3575 मि.मी. पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग- 33(3777), सावंतवाडी- 46(4191.1), वेंगुर्ला- 37(3119.8) कुडाळ- 27(3800),
-
तळेरे – वैभववाडी मार्गावर मोठमोठ्या खड्यांचे साम्राज्य
कासार्डे आनंदनगर येथील अपघातस कारणीभूत ठरणारे खड्डे अखेर युवकांनी श्रमदानाने भरले! तळेरे (संतोष नाईक) – वैभववाडी कोल्हापूर मार्गावरती जागोजागी मोठमोठ्या खड्यांचे साम्राज्य पसरले आहे. संबंधित रस्ते विभागाचे नेहमीप्रमाणे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. कासार्डे आनंदनगर येथील अपघातस कारणीभूत ठरणारे खड्डे अखेर युवकांनी श्रमदानाने भरले. दरवर्षीप्रमाणे यंदाच्या पावसाळ्यात देखील संबंधित
-
मालवणचा झेंडा अटकेपार; भारताची श्रीया परब मिस टुरीझम युनिव्हर्स आशिया २०२१ विजेती
लेबेनॉन येथील २२ देशांच्या स्पर्धेमध्ये श्रीया परब अव्वल, देशाचे केले प्रतिनिधित्व! सिंधुदुर्ग ( निकेत पावसकर यांजकडून):- लेबनॉन येथे २२ देशांच्या राष्ट्रीय स्तरावरील आयोजित मिस टुरीझम युनिव्हर्स आशिया २०२१ या स्पर्धेमध्ये मुळची मालवण तालुक्यातील कांदळगाव येथील असलेली श्रीया परब ही मिस टुरीझम युनिव्हर्स आशिया २०२१ ची विजेती ठरली. या स्पर्धेत तिने देशाचे प्रतिनिधित्व केले होते. या
-
आजअखेर 49 हजार 215 रुग्ण कोरोनामुक्त सक्रीय रुग्णांची संख्या 1 हजार 136
सिंधुदुर्गनगरी, दि. 26 (जि.मा.का):- जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 49 हजार 215 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 1 हजार 136 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 51 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्ण दि. 26/9/2021 ( दुपारी 12 वाजेपर्यंत ) 1 आजचे नवीन पॉझिटिव्ह रुग्ण 50 ( 1 दुबार लॅब तपासणी) एकूण 51 2 सद्यस्थितीतील सक्रीय रुग्ण 1,136 3 सद्यस्थितीत उपचारासाठी जिल्ह्याबाहेर गेलेले


