वृत्तवेध
-
परिवहन मंत्रांच्या जिल्ह्यातच जर महामंडळाचा बेफिकीरपणा…
वैभववाडी-बोरीवली एसटी रिझर्व्हेशनात सावळा गोंधळ! प्रवाशांना नाहक त्रास कशासाठी? सिंधुदुर्गनगरी (संतोष नाईक):- गणेशोत्सव काळात कोकणात मोठ्या प्रमाणावर चाकरमानी दाखल झाले होते. गणेश विसर्जनानंतर गेल्या दोन- तीन दिवसांपासून त्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. कोकणात दाखल होताना रस्त्यांची दुरवस्था पाहता चाकरमान्यांना मोठा त्रास सहन करावा लागला होता. शिवाय परतीच्या प्रवास देखील त्रासदायकच ठरत आहे. शुक्रवार दि.१७
-
कै. दिनकर सामंत ट्रस्ट, मुंबई तर्फे बांदा येथील निराधार महिलेला आर्थिक सहाय्य
सावंतवाडी:- कै. दिनकर गंगाराम सामंत ट्रस्ट, मुंबई तर्फे बांदा येथील श्रीमती सुनेत्रा कामत या गरजू आणि निराधार महिलेला पंधरा हजार रुपयांचा धनादेश डॉ. जयेंद्र परुळेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे श्रीमती कामत यांच्या घराची बरीच पडझड होऊन दुरावस्था झाली होती.
-
पहिल्या ज्ञानपीठ पुरस्काराचे मानकरी वि.स.तथा भाऊसाहेब खांडेकर हे करवीरनगरीचे भुषण: सरनाईक
थोर साहित्यिक वि.स.खांडेकर यांच्या ४५व्या स्मृतीदिनी अभिवादन सिंधुदुर्ग (निकेत पावसकर):- “पहिल्या ज्ञानपीठ पुरस्काराचे मानकरी वि.स.तथा भाऊसाहेब खांडेकर हे करवीरनगरीचे भुषण असून त्यांनी आपल्या साहित्यातून समता आणि मानवतेचा विचार पेरला!”असे उद्गार लोककलेचे अभ्यासक सुनीलकुमार सरनाईक यांनी काढले. प्रतिवर्षी सुसंस्कार शिक्षण संस्था व साने गुरुजी सामाजिक संस्थेच्या वतीने थोर साहित्यिक वि.स.खांडेकर यांचा ४५ व्या स्मृतिदिन साजरा करण्यात
-
रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा उत्पादकांच्या अडचणींवर सकारात्मक मार्ग काढला जाईल – मुख्यमंत्री
मुंबई, दि.३ : अवकाळी पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी सकारात्मक मार्ग निश्चितपणे काढण्यात येईल व आंबा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यात येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे सांगितले. वर्षा येथील समिती कक्षामध्ये आंबा उत्पादक शेतकरी यांच्या अडचणींसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक आयोजित करण्यात आली
-
घराघरांत नळाद्वारे पाणी पोहचविण्यासाठी कालबध्द कार्यक्रम
मुंबई, दि.3 :- जल जीवन मिशन अंतर्गत वर्ष २०२४ पर्यंत राज्यातील ग्रामीण भागात १ कोटी ४२ लाख ३६ हजार नळजोडण्या देण्याचे उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट मोठे असले तरी हे काम पुण्य देणारे आहे आणि ते आपल्याला करावेच लागेल. २०२४ पर्यंत नळजोडण्यांचे हे उद्दिष्ट गाठण्यासाठी कालबध्द कार्यक्रम आखून त्याची सर्व यंत्रणांनी युद्ध पातळीवर अंमलबजावणी करावी, असे
-
विधेयकांबाबत सूचना व सुधारणा मागविण्याचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी, दि. 3 (जि.मा.का.) – संसदेने मंजूर केलेल्या केंद्र शासनाच्या जीवनावश्यक वस्तू (सुधारणा अधिनियम) 2020 या अधिनियमासंबंधीच्या राज्या शासनाच्या अत्यावश्यक वस्तू ( महाराष्ट्र सुधारणा) अधिनियम 2021 या विधेयकाचा मसूदा लोकाभिप्राय अजमावण्यासाठी महाराष्ट्र विधानमंडळाच्या www.mis.org.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. सन 2021 चे विधानसभा विधेयक क्रमांक 17 – शेतकरी ( सक्षमीकरण व संरक्षण ) आश्वासित
-
सिंधुदुर्ग- पाऊस, पाणीसाठा आणि महत्वाच्या नद्यांची पातळी
सिंधुदुर्गनगरी, दि. 31 (जि.मा.का.) – जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक 33 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 20.125 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 3185.3575 मि.मी. पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग –
-
ग्राहकांच्या तक्रारींची निर्गती प्रत्येक विभागाने करावी! – दादासाहेब गिते
सिंधुदुर्गनगरी, दि. 31 (जि.मा.का.) – विविध विभागांकडे ग्राहकांच्या अनेक तक्रारी येत असतात. प्रत्येक विभागाने या तक्रारींची निर्गती आपल्या स्तरावर करावी, अशी सूचना जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य सचिव दादासाहेब गिते यांनी केली. येथील परिषद सभागृहात जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे बैठक आज झाली. याबैठकीला पंचायत समिती सदस्य सुप्रिया वालावलकर, जिल्हा परिषद सदस्य अमरसेन सावंत, नंदकिशोर करवडे,
-
जिल्ह्यात 3 लाख 49 हजार 981 जणांनी घेतला पहिला डोस
सिंधुदुर्गनगरी, दि. 31 (जि.मा.का.) – जिल्ह्यात वाढत्या कोरोना संसर्गामुळे प्रशासनाने लसीकरणावर भर दिला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 3 लाख 49 हजार 981 नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. यामध्ये एकूण 9 हजार 834 हेल्थ वर्करनी पहिला डोस तर 7 हजार 728 जणांनी दुसरा डोस घेतला. 9 हजार 911 फ्रंटलाईन वर्करनी पहिला डोस तर 7 हजार 623
-
केंद्रीयमंत्री नारायण राणे यांची गोपुरी आश्रमाला भेट
कणकवली: -केंद्रीयमंत्री नारायण राणे जन आशीर्वाद यात्रेच्या सातव्या आणि अखेरच्या दिवसाची सुरुवात करताना महात्मा गांधींचे अनुयायी स्व. अप्पासाहेब पटवर्धन यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या कणकवली येथील गोपुरी आश्रमाला भेट दिली आणि तेथील कारभार व कार्यपद्धती समजून घेतली व आपल्या सदिच्छा व्यक्त केल्या.

