वृत्तवेध
-
सावधान- डुप्लिकेट ‘देवगड हापूस आंबा’
परराज्यातील आंबे देवगड हापूस आंबा म्हणून विकला जातोय… सिंधुदुर्गातील आंबा बागायतदार शेतकरी आर्थिक संकटात! कणकवलीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून परराज्यातील आंबे देवगड हापूस आंबा म्हणून वितरीत होतो? ग्राहकांची फसवणूक आणि प्रशासनाचे दुर्लक्ष! कणकवली (विशेष प्रतिनिधी):- परराज्यातील आंबे आणून सिंधुदुर्गात ‘देवगड हापूस आंबा’ म्हणून विकला जातोय. ही खरेदीदारांची (गिऱ्हाईकांची) चक्क फसवणूक आहे. ह्या गैरप्रकारामुळे सिंधुदुर्गातील हापूस
-
गढीताम्हाणे : मारहाणप्रकरणी अटकपूर्व जामीन मंजूर
सिंधुदुर्गनगरी:- गढीताम्हाणे-मधलीवाडी येथील मारहाणप्रकरणी विकास चंद्रकांत कदम (५४) व आदित्य विकास कदम (२२) या संशयितांचा अटकपूर्व जामीन अर्ज सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एच. बी. गायकवाड यांनी मंजूर केला आहे. संशयितांच्यावतीने ॲड. मिलिंद नकाशे, ॲड. विठोबा मसुरकर व ॲड. अनंत नकाशे यांनी काम पाहिले. गढीतम्हाणे मधलीवाडी येथील यशवंत विश्वास कदम यांना तेथील संशयित आदित्य
-
सिंधुदुर्गात मतदानाच्या दिवशी आठवडे बाजार बंद
सिंधुदुर्गनगरी दि 5 (जिमाका) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता 46 रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघासाठी दि. 7 मे 2024 रोजी मतदान प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. जिल्ह्यातील ज्या-ज्या ठिकाणी आठवडा बाजार भरविण्यात येतो, त्या-त्या ठिकाणी मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा, मतदान सुरळीतपणे पार पाडावे, याकरीता कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने मतदान दिवशी
-
सिंधुदुर्ग- ९१८ मतदान केंद्रावर ६ लक्ष ६४ हजार ५६६ मतदार मताधिकार बजावणार!
मतदारांनी मतदानाचा हक्क बजावण्याचे सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन सिंधुदुर्गनगरी (जिमाका):- लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७ मे रोजी मतदान होणार आहे. सकाळी सात वाजल्यापासून मतदानास प्रारंभ होणार आहे. मतदानासाठी जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण ९१८ मतदान केंद्रावर ६ लक्ष ६४ हजार ५६६ मतदार आपला मताधिकार बजावणार आहेत. सायंकाळी सहापर्यंत मतदान होणार असून
-
मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदार संघ- सुप्रसिद्ध सनदी लेखापाल विट्टेश्वर पेरियनाडार यांचा उमेदवारी अर्ज दाखल!
मुंबई:- दक्षिण मध्य लोकसभा मतदार संघातून सुप्रसिद्ध सनदी लेखापाल (Chartered Accountant), सामाजिक कार्यकर्ते विट्टेश्वर पेरियनाडार यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज नुकताच दाखल केला आहे. विश्वामध्ये भारताला सामर्थ्यवान करण्यासाठी विट्टेश्वर पेरियनाडार यांच्याकडे सुनियोजित कार्यक्रम असून त्यानुसार गेली वीस वर्षे ते समर्पित वृत्तीने कार्य करीत आहेत. उच्चशिक्षित, सुसंस्कारीत, आध्यात्मिक असलेल्या विट्टेश्वर पेरियनाडार यांनी सामर्थ्यवान भारताचे स्वप्न साकार
-
सिंधुदुर्गनगरी- महाराष्ट्र राज्य स्थापनेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा
जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण देशाच्या विकासात महाराष्ट्राचे योगदान महत्वाचे! शेतकरी, कष्टकरी, कामगार यांच्या घामातून राज्य प्रगतीपथावर! सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का): महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याचा निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो. याच दिवशी 1960 साली स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. महाराष्ट्राचा ऐतिहासिक, सांस्कृतिक व सामाजिक वारसा फार मोठा आहे. देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत आणि
-
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या हस्ते ध्वजारोहण
सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का): महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी अपर जिल्हाधिकारी रवी पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपजिल्हाधिकारी रविंद्र मठपती, उप जिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे, उपजिल्हाधिकारी शारदा पोवार, आरती देसाई, तहसिलदार प्रज्ञा काकडे, जिल्हा नियोजन अधिकारी श्री बुधावले, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, माविमचे
-
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षकांनी घेतली हॉटेल व लॉज मालकांची बैठक
सिंधुदुर्गनगरी, दि.01 (जि.मा.का): लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी जिल्ह्यातील हॉटेल व लॉज मालकांची बैठक घेतली. बैठकीत पोलीस अधीक्षकांनी पुढील प्रमाणे सूचना दिल्या. हॉटेल, लॉज, निवासी व न्याहरी योजनेअंतर्गत निवासस्थाने, भाडे तत्वावरील निवासस्थाने इत्यादी व्यवसायिकांनी त्यांच्याकडे राहण्यास आलेल्या सर्व व्यक्तीचे पूर्ण नाव, पत्ता, ओळखपत्र, त्यांचे मोबाईल नंबर, त्यांच्याकडील वाहनाचा प्रकार व क्रमांक,
-
रक्तदान शिबीर संपन्न करून साजरा केला वाढदिवस!
श्री. संतोष वाळके यांना ५० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा! आमचे मित्र श्री. संतोष वाळके यांचा वाढदिवस काल अनोख्या पद्धतीने पावाचीवाडी- नांदगाव (ता. देवगड, जिल्हा- सिंधुदुर्ग) येथे साजरा करण्यात आला. वाढदिवस म्हटला की मित्रमंडळींना पार्टी देणं, मौजमस्ती करणं आलंच! ह्यात काही वाईट नाही; पण तोच वाढदिवस जेव्हा सामाजिक बांधिलकी स्वीकारून केला जातो तेव्हा त्याचे मोल अनमोल
-
लाखो रुग्णांना जीवदान देणाऱ्या रक्तदानाच्या महायज्ञात १४ हजार २८३ रक्त युनिट जमा!
‘श्री अनिरुद्ध उपासना फाउंडेशन’ व संलग्नित संस्था आयोजित राज्यात अनेक ठिकाणी महारक्तदान शिबीर सन १९९९ पासून आजपर्यंत २ लाखपेक्षा जास्त युनिट रक्तदान! मुंबई- ‘दिलासा मेडिकल ट्रस्ट अॅण्ड रिहॅबिलिटेशन सेंटर’, ‘अनिरुद्धाज् अकॅडमी ऑफ डिजास्टर मॅनेजमेंट’ आणि ‘श्री अनिरुद्ध उपासना फाउंडेशन’ या संस्थांतर्फे श्रीहरिगुरूग्राम (न्यू इंग्लिश स्कुल, बांद्रा पूर्व, मुंबई), पुणे आणि राज्यात विविध ठिकाणी आज रविवारी










