श्रद्धावान डॉ. आनंद कोरे यांच्या स्मृतींचे पुण्यस्मरण!

कोल्हापुरातील वारणानगर म्हटलं पहिलं ज्याचं स्मरण होतं ते डॉ. आनंद कोरे. आज त्यांचा तृतीय पुण्यस्मरण दिन. खूप चांगला प्रेमळ मित्र, हितचिंतक आणि पाक्षिक `स्टार वृत्त’ला सहकार्य करणारे व्यक्तिमत्व डॉ. आनंद…

डॉ. आनंद कोरे यांच्याशी कोल्हापूरच्या मेडिकल कॅम्पमध्ये माझ्यासह इतर श्रद्धावान संवाद साधताना!

कोल्हापुरातील वारणानगर म्हटलं पहिलं ज्याचं स्मरण होतं ते डॉ. आनंद कोरे. आज त्यांचा तृतीय पुण्यस्मरण दिन. खूप चांगला प्रेमळ मित्र, हितचिंतक आणि पाक्षिक `स्टार वृत्त’ला सहकार्य करणारे व्यक्तिमत्व डॉ. आनंद कोरे तीन वर्षांपूर्वी अचानक सदगुरु चरणी समर्पित झाले. त्यावेळी लिहिलेले संपादकीय पुढील लिंकवर उपलब्ध आहे. ( https://starvrutta.in/dr-anand-kore-happiness-became-one-in-sachchidananda/ संपादकीय- `आनंद’ सच्चिदानंदामध्ये एकरूप झाला!)

जुन्या काळात पहिले एम.बी.बी.एस. डॉक्टर म्हणून डॉ. गजानन कोरे यांनी वारणा परिसरातील जनतेला आरोग्यसेवा दिली. वडिलांच्या या आदर्शावर वाटचाल करीत डॉ. आनंद कोरे आणि पत्नी डॉ. सुचेता कोरे यांनी वारणानगर येथे संजीत मेमोरियल व कोरे हॉस्पीटलची स्थापना केली. या ठिकाणी महिलांवरील प्रामुख्याने सर्व उपचार व्हायचे आणि होत आहेत. या सेवेत मातृत्वापासून वंचीत रहाणाऱ्या महिलासांठी टेस्टट्यूब बेबी सेंटरची स्थापना करून या सेंटरच्या माध्यमातून शेकडो महिलांना त्यांनी मातृत्व दिले. शांत, संयमी, मितभाषी प्रेमळ स्वभावाचे असणारे डॉ. आनंद कोरे सर्वांना दिलासा देणारे डॉक्टर होते. वैद्यकीय क्षेत्रातील सर्व आधुनिक यंत्रसामुग्रीचा वापर करून सर्वोकृष्ट वैद्यकीय सेवा देण्यात त्यांनी सातत्य राखले होते. अशा आदर्श व्यकीच्या पुण्यदिनानिमित्त पाक्षिक `स्टार वृत्त’ परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली!

-नरेंद्रसिंह हडकर

You cannot copy content of this page