कोरोना महामारी अस्तित्वात नाही!… कोरोना महामारी आंतरराष्ट्रीय षडयंत्र?

संपादकीय लेखाचे शिर्षक वाचून शिर (मस्तक) गरगर फिरायला लागेल. कोरोना महामारी अस्तित्वात नाही म्हटले तर जगात एवढे मृत्यू का झाले? हा मोठा प्रश्न समोर येतो. जगातील-भारतातील माध्यमं काय म्हणताहेत? शासनाची…

संपादकीय लेखाचे शिर्षक वाचून शिर (मस्तक) गरगर फिरायला लागेल. कोरोना महामारी अस्तित्वात नाही म्हटले तर जगात एवढे मृत्यू का झाले? हा मोठा प्रश्न समोर येतो.

जगातील-भारतातील माध्यमं काय म्हणताहेत? शासनाची आकडेवारी काय सांगते? आज संपूर्ण जगामध्ये कोरोनाच्या तथाकथित महामारीने थैमान घातले आहे. भारतामध्ये सुद्धा आजमितीपर्यंत २० लाख २७ हजार रुग्ण सापडले. त्यापैकी १३ लाख ७८ हजार रुग्ण बरे होऊन घरी गेले. तर ४१ हजार ५०० रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. मृत्यूचे प्रमाण शेकडा दोन टक्के एवढं अत्यल्प असल्याने जगामध्ये इतर देशांच्या तुलनेत भारत कोरोनाला रोखण्यामध्ये कसा यशस्वी झाला; त्याच्या गाथा सांगितल्या जात आहेत. शासनाची आकडेवारी भयावह वाटत असली तरी कोरोना महामारीच्या मागील वास्तव समजून घेणे खूप गरजेचे आहे. त्यासाठी अनेक वैद्यकीय तज्ञांनी आपली मते मांडण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांची मते विचारात घेण्याऐवजी त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले; ही खूप मोठी दुर्दैवाची बाब आहे.

दिल्लीतील डॉ. तरुण कोठारी (MBBS MD) यांनी मांडलेले मुद्दे विचारात घ्यायलाच हवेत. दिल्लीतील प्रसिद्ध वैद्यकीय तज्ञ डॉ. तरुण कोठारी यांनी कोरोना महामारीविषयी मांडलेली मते, त्यांनी दिलेले आव्हान, त्यांनी मांडलेले मुद्दे शासनाला नाकारता येणारे नाहीत; असे प्रथमदर्शनी तरी दिसते. म्हणूनच शासनाने पुढाकार घेऊन देशवासियांसमोर डॉ. तरुण त्रिपाठी यांनी आणि त्यांच्यासारख्या अनेक डॉक्टरांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली पाहिजेत. तरच शासनाचा प्रामाणिकपणा आणि कार्यक्षमता सिद्ध होईल.

 डॉ. तरुण कोठारी यांची मुलाखत पाहण्यासाठी इथे क्लिक करा! 

देशातील अनेक डॉक्टर आज कोरोना महामारीविषयी आपली मतं मांडत आहेत. त्यांचे ते अनुभव आहेत. त्या अनुभवाचा फायदा देशाला होऊ शकतो. पण शासनाने त्यांना आदराने सहकार्य करण्याचे निमंत्रण दिले पाहिजे. भारतासह संपूर्ण जग ह्या महाभयंकर जीवघेण्या त्रासातून प्रवास करीत आहे. आज देश थांबलाय. देशातील प्रत्येक नागरिक आज शारीरिक आर्थिक आणि मानसिक त्रासाला तोंड देत आहे. त्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने केलेल्या उपाययोजना पुरेशा नाहीत. मागील पाच महिने नरकयातना भोगत असताना देशवासियांना अजूनही आशेचा किरण दिसत नाही.

अशा अडचणीच्यावेळी आपली मते शास्त्रीयदृष्ट्या बिनधास्तपणे मांडणाऱ्या वैद्यकीय तज्ञांचे मार्गदर्शन घ्यायला हवे. परंतु त्यांचे मार्गदर्शन सोडाच; त्यांनी मांडलेल्या मुद्द्यांकडे तरी लक्ष देण्याची नैतिकता शासनाने दाखविली पाहिजे. डॉ. तरुण कोठारी आपली बाजू, आपली भूमिका, आपले मुद्दे मार्च महिन्यापासून मांडत आहेत. त्यांनी देशाचे राष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय मंत्री, देशातील मुख्यमंत्री आणि त्यांचे प्रमुख सचिव, देशातील मिडिया यांना मेल करून आपले म्हणणे मांडले. युट्युबवर ४० व्हिडीओ सादर केले. पत्रकार परिषद घेऊन केंद्रशासनाला दहा प्रश्न विचारले. कोणीही प्रतिसाद दिला नाही. मीडियाने सुद्धा त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात धन्यता मानली. त्यामुळे दखल न घेणाऱ्या यंत्रणेच्या प्रामाणिकपणावर प्रश्नचिन्ह निर्माण होते.

 डॉ. तरुण कोठारी यांची पत्रकार परिषद पाहण्यासाठी इथे क्लिक करा! 

डॉ. तरुण कोठारी यांचे काही मुद्दे, काही प्रश्न…

मार्च महिन्यापासून देश थांबलाय. प्रत्येक कुटुंबाची आणि देशाची आर्थिक घडी विस्कटली आहे. आजही संभ्रमावस्था आहे. कुठलेही पारदर्शक धोरण दिसत नाही. असे किती दिवस चालणार? देशाच्या नागरिकांना वास्तव समजले पाहिजे. अजूनही वेळ गेलेली नाही. भारतासारख्या अध्यात्मिक अधिष्ठान असणाऱ्या देशांमध्ये कुठल्याही षड्यंत्राला यशस्वी होऊ द्यायचे नाही; अशी मानसिकता ठेवल्यास भारत संपूर्ण जगाचे नेतृत्व करू शकतो; हे वास्तव आहे.

-नरेंद्र हडकर

https://starvrutta.in/editorial-corona-virus-infection-is-a-small-part-of-world-war-iii/
कोरोना विषाणू संसर्ग हा तिसऱ्या महायुद्धाचा एक छोटासा भाग…
कोरोना विषाणू संसर्ग `एक मोठं षडयंत्र आहे’…गाफीलपणा नडला, लाखो मृत्यूला आमंत्रण दिले!
७ एप्रिल २०२० रोजी प्रसिद्ध झालेले संपादकीय वाचण्यासाठी वरील लिंकवर क्लिक करा!

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page