वैद्यकीय विज्ञान क्षेत्रातील प्रगत संशोधनाचा अभ्यासक्रमात समावेश करावा – राज्यपाल

राज्यपाल, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आरोग्य विद्यापीठ आंतरराष्ट्रीय शैक्षणिक केंद्राचे उद्घाटन;

१३ देशांच्या ४१ संस्थांशी सामंजस्य करार

मुंबई:- वैद्यकीय विज्ञान क्षेत्रातील प्रगत संशोधनामुळे विविध आजारांचे निदान आणि उपचारासाठी योग्य मार्ग सापडले आहेत. त्याचा वैद्यकीय विज्ञान अभ्यासक्रमात समावेश करावा जेणेकरून विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावतील. राज्यासह देशाला अधिक प्रशिक्षित डॉक्टरांची गरज असून त्यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा देता येईल, यासाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने सुरू केलेले आंतरराष्ट्रीय शैक्षणिक केंद्र महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय शैक्षणिक केंद्राचे उद्घाटन व प्राथमिक सामंजस्य करार आदान प्रदान समारंभ येथील सह्याद्री अतिथीगृहात झाला. त्यावेळी राज्यपाल बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन, पश्चिम ऑस्ट्रेलियाचे पर्यटनमंत्री पॉल पॅपेलीया, राज्याचे वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री रविंद्र चव्हाण, कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर आदी यावेळी उपस्थित होते.

आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय शैक्षणिक केंद्राद्वारे विद्यापीठाची शिक्षणप्रणाली जागतिक पातळीवर नेण्यासाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध शैक्षणिक संस्था, विद्यापीठ, ट्रस्ट अशा १३ देशातील निवडक ४१ संस्थांसमवेत समवेत सांमजस्य करार राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

देशातील विद्यार्थ्यांना जागतिक पातळीवरील अत्याधुनिक ज्ञानाची आवश्यकता भासते. त्यांच्या या अपेक्षा विद्यापीठाने सुरू केलेले केलेल्या जागतिक केंद्राच्या माध्मयातून पूर्ण होतील असा विश्वास व्यक्त करीत राज्यपाल म्हणाले की, भारतीय डॉक्टर आणि शल्यचिकित्सकांना जागतिक पातळीवर मोठा मान आहे. आपल्या देशातील डॉक्टर परदेशात जाऊन तेथील नागरिकांना उपचार देतात ही सुखावणारी बाब आहे. देशातील अनेक विद्यार्थी परदेशातील विद्यापीठांमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत आहेत. आता भारतातील विद्यापीठांनी परदेशातील विद्यार्थ्यांना आपल्याकडे आकर्षित करून घेण्याची वेळ आली आहे. त्यासाठी त्यांनी अत्याधुनिक शिक्षणपद्धती तयार केली पाहिजे. आंतरराष्ट्रीय शिक्षण केंद्र सुरू केल्याबद्दल राज्यपालांनी कुलगुरूंचे अभिनंदन केले.

वैद्यकीय क्षेत्रातील संशोधनात्मक शिक्षणाच्या आदान प्रदानाची गरज- मुख्यमंत्री

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, वैद्यकीय क्षेत्रातील संशोधनात्मक शिक्षणाच्या आदान प्रदानाची गरज ओळखून हे केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्याचा लाभ देशातील तसेच परदेशातील नागरिकांना उत्तम आरोग्य सेवेसाठी होईल. माहिती तंत्रज्ञानाच्या वापरामुळे जग जवळ येत आहे. त्याचा वापर करून जागतिक स्तरावरील सर्वोत्तम ज्ञान आणि यशकथा विद्यार्थ्यांना देता आल्या तर सामान्य नागरिकाला निरोगी आरोग्य लाभण्यास मदतच होईल. ज्ञान मिळवितानाच ते इतरांना देखील देण्याची गरज आहे. आपल्या देशातील पारंपरिक अशा आयुर्वेद आणि योगाभ्यासाचा जागतिक पातळीवर स्वीकार झाला आहे. त्याच्या माध्यमातून अनेकांना निरोगी आयुष्यमान मिळाले आहे.

आरोग्य क्षेत्रातील गुणवत्तापूर्ण उपचाराची गरज लक्षात घेऊन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी देशातील सामान्य नागरिकाला आधार देणारी आयुष्यमान भारत योजना सुरू केल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले.

यावेळी श्री. पॅपेलिया, डॉ. म्हैसेकर यांनी मनोगत व्यक्त केले. राज्यपालांच्या हस्ते आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय शैक्षणिक केंद्राच्या संकेतस्थळाचे आणि सुरू करण्यात आलेल्या नवीन विभागाचे उद्घाटन करण्यात आले. त्याचबरोबर माहिती पुस्तिकेचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाची सुरूवात आणि समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला.

या संस्थांसोबत झाला सामंजस्य करार:
हेल्थ करिअर्स इंटरनॅशनल, मलेशिया ; हेल्थ करिअर्स इंटरनॅशनल, फिलीपाईन्स ; हेल्थ करिअर्स इंटरनॅशनल, दुबई ; ग्लोबल एज्युकेशन ॲन्ड एम्पॉयमेंट कंसार्शियम, ऑस्ट्रेलिया ; इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ ॲन्ड मॅनेजमेंट, ऑस्ट्रेलिया ; एडिनबर्ग युनिव्हर्सिटी युनायटेड किंगडम नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ नॅचरल मेडिसिन, पोर्ट लँड, ओरेगॉन यु. एस. ए. सिउनी किमेल मेडिकल स्कुल- थॉमस जेफरसन युनिवहर्सिटी, फिलांडेलफिया यु. एस . ए एज हिल युनिवहर्सिटी, ऑस्मकिक, युनाएटेउ किंगडम कॉलेज; ऑफ आयुर्वेदा, युनाएटेड किंगडम; ग्लोबल हेल्थ एक्चेंज, इंग्लंड; राईटिंगटन, विगन ॲन्ड एनएचएस ट्रस्ट, युनाएटेड किंगडम; बॅपिओ, युनाएटेड किंगडम; सैबरजया युनिव्हर्सिअी कॉलेज ऑफ मेडिकल सायन्स मलेशिया; योगा पॉईन्ट, ऑस्ट्रेलिया; योगा पॉईन्ट लि, सिंगापूर; आयुर्योगाजया, जर्मनी; पॉइनट झिरो फलोटेशन सेंटर अबुधाबी; आयुर्वेद ॲन्ड योगा इन्स्टिट्यूट, ऑस्ट्रेलिया; प्रमदानी आयुर्वेद क्लिनिक, नेदरलँड; युनेस्को चेअर ऑफ बायोइथिकस हैफा करियर इंटरनॅशनल, फिलिपाईन्स; अमेरिका स्पोर्ट मेडिसिन ॲन्ड ऑसथोस्कोपी इन्स्टिअयुअ, सॅन ॲन्टोरिया; निप्रोवस मेडिकल ॲकेडमी, युक्रेन; एच.सी.जी.एन.एच.आर.आय. कॅनसर सेंटर, नागपूर मर्क, डी. एम. ई. आर, मुंबई क्लेफ्ट फांऊडेशन लॅगशायर युनाएटेड किंगडम; ॲडव्हान्स इन्स्टिट्यूट ऑफ होमिओपॅथी, ग्रीस; द ओला ग्रिम्सबाय, सॅन डियागो; नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट; नागपूर; ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदा नवी दिल्ली; नॅशनल इन्स्टिट्यूट आफ आयुर्वेदा जयपूर; स्वामी विवेकानंद सुभारती विद्यापीठ, मेरठ; सोलापूर विद्यापीठ, सोलापूर; किश्ना इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस कराड; चेस्ट रिसर्च फाउन्डेशन, पुणे स्टेट बँक ऑफ इंडिया; पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, आयडीबीआय बँक; द ओरिजिन फांउडेशन; डॉ. बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठान, डॉ. हेगडेवार हॉस्पिटल, औरंगाबाद. (‘महान्यूज’)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page