२०२४ मध्ये तब्बल १२९ सुट्ट्या मिळणार…
मुबई:- शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपासून पालक, सरकारी कर्मचारी, शिक्षक, बँक कर्मचारी यांचे डोळे सुट्ट्यांच्या यादीकडे लागून राहिलेले असते; कारण तसा परगावी जाण्याचा `प्लॅन’ आखावा लागतो, घरगुती कार्यक्रमाचे नियोजन करावे लागते. शासनाने २०२४ च्या सार्वजनिक सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. २०२४ मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना एकूण २४ सार्वजनिक सुट्ट्या मिळणार आहेत. नऊ सुट्ट्या सोमवारी किंवा शुक्रवारी येत असल्याने लोकांना २०२४ मध्ये दिर्घ रजेचा आनंद घेता येणार आहे. याबाबतची अधिसूचना दिनांक ९ नोव्हेंबर २०२३ रोजी काढण्यात आली आहे.
२०२४ मधील सार्वजनिक सुट्ट्यांची संपूर्ण यादी…
१. प्रजासत्ताक दिन – २६ जानेवारी, शुक्रवार
२. छत्रपती शिवाजी महाराज जयंती – १९ फेब्रुवारी, सोमवार
३. महाशिवरात्री – ८ मार्च, शुक्रवार
४. होळी (दुसरा दिवस) – २५ मार्च, सोमवार
५. गुड फ्रायडे – २९ मार्च, शुक्रवार
६. गुढीपाडवा – ९ एप्रिल, मंगळवार
७. रमझान ईद – ११ एप्रिल, गुरुवार
८. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती – १४ एप्रिल, रविवार
९. रामनवमी – १७ एप्रिल, बुधवार
१०. महावीर जयंती – २१ एप्रिल, रविवार
११. महाराष्ट्र दिन – १ मे, बुधवार
१२. बुद्ध पौर्णिमा – २३ मे, गुरुवार
१३. बकरी ईद (ईद उल झुआ) – १७ जून, सोमवार
१४. मोहरम – १७ जुलै, बुधवार
१५. स्वातंत्र्य दिन – १५ ऑगस्ट, गुरुवार
१६. पारशी नववर्ष दिन (शहेनशाही) – १५ ऑगस्ट, गुरुवार
१७. गणेश चतुर्थी – ७ सप्टेंबर, शनिवार
१८. ईद-ए-मिलाद – १६ सप्टेंबर, सोमवार
१९. महात्मा गांधी जयंती – २ ऑक्टोबर, बुधवार
२०. दसरा – १२ ऑक्टोबर, शनिवार
२१. दिवाळी अमावस्या (लक्ष्मीपूजन) – १ नोव्हेंबर, शुक्रवार
२२. दिवाळी (बलिप्रतिपदा) – २ नोव्हेंबर, शनिवार
२३. गुरुनानक जयंती – २५ नोव्हेंबर, शुक्रवार
२४. ख्रिसमस – २५ डिसेंबर, बुधवार
राज्य शासनाने अजून एक ३ नोव्हेंबर रोजी अतिरिक्त सुट्टी राज्य शासकीय कार्यालये, राज्य शासनाचे उपक्रम तसेच महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत यांच्यासाठी जाहीर केली आहे. अधिसूचनेनुसार दिनांक ३ नोव्हेंबर २०२४ रोजी भाऊबीज निमित्त सुट्टी मिळणार आहे. बँकांना आपले वार्षिक लेखे पूर्ण करता येण्यासाठी १ एप्रिल, २०२४, सोमवार रोजी सुट्टी असणार आहे.
२०२४ मध्ये तब्बल १२९ सुट्ट्या मिळणार…
सन २०२४ या वर्षात एकूण ५२ रविवार आणि राज्य शासनाने जाहीर केलेल्या २४ सार्वजनिक सुट्ट्या अशा एकूण ७६ सुट्ट्या आहेत आणि ज्या शासकीय कार्यालयांना ५ दिवसाचा आठवडा लागू आहे, अशा कार्यालयातील कर्मचाऱ्यांना तब्बल १२९ सुट्ट्या मिळणार आहे. यामध्ये ५२ रविवार आणि ५२ शनिवार (दोन शनिवारच्या सुट्ट्या ह्या सार्वजनिक सुट्यात पकडलेले आहे.), २४ सार्वजनिक सुट्ट्या, आणि १ अतिरिक्त शासकीय कार्यालयांसाठी सुट्टी अशा एकूण तब्बल १२९ सुट्ट्या कर्मचाऱ्यांना मिळणार आहेत.