महाराष्ट्रात कोरोनाचा विस्फोट- ५५ हजार ४६९ नवीन रुग्ण रुग्णांचे निदान तर २९७ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू

मुंबई:- आज महाराष्ट्रात कोरोनाचा विस्फोट झाला असून ५५ हजार ४६९ नवीन रुग्णांचे निदान झाले तर २९७ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. आज ३४ हजार २५६ रुग्ण बरे होऊन घरी गेले.…

मुंबई:- आज महाराष्ट्रात कोरोनाचा विस्फोट झाला असून ५५ हजार ४६९ नवीन रुग्णांचे निदान झाले तर २९७ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. आज ३४ हजार २५६ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण २५ लाख ८३ हजार ३३१ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८२.९८% एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८१% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २ कोटी ९ लाख १७ हजार ४८६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ३१ लाख १३ हजार ३५४ (१४.८८ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २४ लाख ५५ हजार ४९८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २२ हजार ७९७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page