वैद्यकीय महाविद्यालयातील अडचणी दूर करा! अधिकाऱ्यांची हप्तेखोरी रोखण्यासाठी वाळू लिलाव सुरु करा!
सिधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अडचणी दूर करा! अधिकाऱ्यांची हप्तेखोरी रोखण्यासाठी वाळू लिलाव सुरु करा! -विधानसभेत आमदार वैभव नाईक यांची मागणी
नागपूर:- (प्रतिनिधी):- सिधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अधिकाऱ्यांच्या मनमानीमुळे रुग्णांची प्रचंड गैरसोय होत असून त्याबाबत त्वरित निर्णय घेऊन शासनाने अडचणी दूर कराव्यात त्याचप्रमाणे सिंधुदुर्गात वाळूच्या लिलावाबाबत शासनाचे अधिकारी कार्यवाही करीत नाहीत. वाळूचे लिलाव सुरु केलेले नाहीत. त्यामुळे अधिकाऱ्यांची हप्तेखोरी वाढली आहे. ही हप्तेखोरी रोखण्यासाठी वाळू लिलाव सुरु करा; अशी मागणी आज विधानसभेत आमदार वैभव नाईक यांनी केली आहे.