मुंबई (मोहन सावंत):- “भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री फग्गनसिंह कुलस्ते यांनी रस्त्याची तुलना त्यांच्याच पक्षाच्या सन्माननिय खासदार हेमा मालिनी यांच्याशी केली. मा नरेंद्रजी मोदी यांनी या मंत्र्यांवर कारवाईची हिम्मत दाखवावी!” असे ट्विट शिवसेनेच्या प्रवक्त्या आमदार डॉ. मनिषा कायंदे यांनी काल रात्री केले आहे.
भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री फग्गनसिंह कुलस्ते यांनी रस्त्याची तुलना त्यांच्याच पक्षाच्या सन्माननीय खासदार हेमा मालिनी यांच्याशी केली. मा नरेंद्रजी मोदी यांनी या मंत्र्यांवर कारवाईची हिम्मत दाखवावी. #PMNarendraModi #BJP #Hema #HemaMalini @ShivsenaComms pic.twitter.com/IiKl3HdbDx
— Dr.Manisha Kayande (@KayandeDr) February 19, 2022
त्या आपल्या ट्विट केलेल्या व्हिडिओत म्हणतात,
आज छत्रपती असते तर मोदीजींच्या मंत्रिमंडळातील मंत्री फग्गनसिंह कुलस्ते यांची जीभ हासडली असती. काय म्हणाले हे महाशय? तर ते असं म्हणाले की, भारतीय जनता पार्टीच्या खासदार हेमामालिनी यांच्या गालासारखे गुळगुळीत रस्ते आहेत. हाच विषय जेव्हा आमचे मंत्री माननिय गुलाबराव पाटील यांच्याबाबतीत झाला, तेव्हा सतत टिवटिव करणाऱ्या विचित्रा वाघ यांनी थोबाड फोडण्याची भाषा केली होती. मग आता ह्यांची दातखिळी बसली आहे का? आता भारतीय जनता पार्टीचे मोदीजी, आपल्या देशाचे पंतप्रधान मोदीजी ५६ इंच छाती पुढे करत असतात; ते या महाशयांना आवरणार आहेत का? त्यांचा राजीनामा घेणार आहेत का? स्त्री कोणतीही असो, कोणत्याही पक्षाची असो; पण तिचा मानसन्मान झालाच पाहिजे. खासदार हेमामालिनीजी सन्माननिय नेत्या आहेत आणि त्यांच्याबाबतीत असं बोलणं किंवा कोणत्याही स्त्रीच्या बाबतीत असं बोलणं हे अशोभनीय आहे. माझा मोदीजींना थेट सवाल आहे की, ते आता हिम्मत दाखविणार आहेत का? आज आपण शिवजयंती साजरी करतो, ह्या शिवजयंतीच्या दिवशी स्त्रीचा अपमान करणाऱ्या फग्गनसिंह कुलस्ते यांची जीभ आपण हासडणार आहेत का?
ह्या ट्विटमधून शिवसेनेच्या प्रवक्त्या आमदार डॉ. मनिषा कायंदे यांनी आपली रोखठोक भूमिका मांडली आहे.
