मुंबई (प्रतिनिधी):- सुप्रसिद्ध शिवनेरी कबड्डी संघातील यश उमेश राकशे (चढाईपटू) आणि अजय अनिल गुरव (मध्यरक्षक) या युवा खेळाडूंची परभणी येथे झालेल्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी मुंबई जिल्हा शहर कबड्डी संघात निवड झाल्याबद्दल शिवनेरी सेवा मंडळातर्फे छोटासा कौटुंबिक सत्कार सोहळा व परभणी दौऱ्यासाठी शुभेच्छा सोहळा संपन्न झाला.
यावेळी जानकी खोखो पुरस्कार विजेत्या राष्ट्रीय खेळाडू शुभांगी जाधव आणि संस्थेचे प्र.कार्यवाह नितीन पेडणेकर यांच्याकडून राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंना सन्मानित केले गेले. ह्या दोन खेळाडूंना शिवनेरी सेवा मंडळाचे कबड्डी प्रशिक्षण श्री.गुरु मोरजकर यांचे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमाला मंडळाचे सदस्य व कबड्डी खेळाडू उपस्थित होते.
