पाक्षिक `स्टार वृत्त’च्या बातमीची दखल- लस वाया जाऊ नये म्हणून जिल्हा आरोग्य प्रशासनाची दक्षता

सिंधुदुर्गनगरी (संतोष नाईक):- लसीकरणाबाबत ठोस भूमिका घेऊन आरोग्य विभागाने लस वाया घालवू नये!’ ह्या मथळ्याखाली पाक्षिक `स्टार वृत्त’ने काल बातमी प्रसिद्ध केली होती. त्याची दखल घेत जिल्हा आरोग्य प्रशासनाने योग्य…

सिंधुदुर्गनगरी (संतोष नाईक):- लसीकरणाबाबत ठोस भूमिका घेऊन आरोग्य विभागाने लस वाया घालवू नये!’ ह्या मथळ्याखाली पाक्षिक `स्टार वृत्त’ने काल बातमी प्रसिद्ध केली होती. त्याची दखल घेत जिल्हा आरोग्य प्रशासनाने योग्य असे आदेश देऊन लस वाया जाणार नाही ह्याची पूर्णतः दक्षता घेतली आहे. त्याबाबत पाक्षिक `स्टार वृत्त’चे आभार जागृत नागरिक आणि आरोग्य केंद्रातील अनेक डॉक्टरांनी मानले आहेत.

कोविड-१९ आजाराला प्रतिबंधित करणारी लसीचा पुरवठा अत्यल्प असल्याने सिंधुदुर्गात लसीकरणाचा वेग अतिशय कमी आहे. त्यामुळे कोविड-१९ आजाराला प्रतिबंधित करणारी लस न मिळाल्याने कोविड-१९ ह्या आजाराशी मुकाबला करण्यासाठी उपलब्ध असणारा एकमेव पर्याय संपतो. म्हणूनच जिल्हयासाठी जी लस येते ती वाया जाऊ नये; असे मत अनेकांनी आमच्या प्रतिनिधींकडे व्यक्त केले होते. त्याबाबतची सविस्तर बातमी काल

लसीकरणाबाबत ठोस भूमिका घेऊन आरोग्य विभागाने लस वाया घालवू नये! (सदर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा!)

प्रसिद्ध करण्यात आली होती. त्याची दखल घेत जिल्हा आरोग्य प्रशासनाने योग्य असे आदेश देऊन लस वाया जाणार नाही ह्याची पूर्णतः दक्षता घेतली आहे.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page