नवी दिल्ली:- केंद्र सरकारवर आंध्रप्रदेशला विशेष दर्जा देण्याच्या मुद्यावरून तेलगू देसमने आणलेला अविश्वास प्रस्ताव मतदानाने फेटाळण्यात आला. अविश्वास प्रस्तावाचा बाजूने फक्त १२६ तर विरोधात ३२५ मते मिळाली. सोळाव्या लोकसभेमधील सरकारवरील अविश्वास प्रस्तावावर आज सकाळी ११ वाजल्यापासून सलग चर्चा सुरु झाली ती रात्री ११.११ वाजता संपली. ह्या चर्चेदरम्यान विरोधकांनी मोदी सरकारवर कडक शब्दात टीका केली तर सत्ताधाऱ्यांनी त्याची उत्तरे दिली. शेवटी अविश्वास प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकारची भूमिका विषद करताना विरोधकांचे आरोप फेटाळून लावले. नव्वद मिनिटांच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागील काँग्रेस सरकारच्या चुकीच्या निर्णयांवर देशाला कसा तोटा झाला? ते सांगितले. त्याचप्रमाणे आपल्या सरकारची कार्याची प्रशंसा केली.
काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपले भाषण अर्धवट ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे गेले आणि त्यांना आलिंगण दिले. ह्या कृतीवर आज माध्यमांमध्ये उलट सुलट चर्चा सुरु होती.

Leave a Reply