मुंबई:- महाराष्ट्राबाहेरून दहावी व बारावीच्या परिक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांसाठी आरोग्य विज्ञान पदवी अभ्यासक्रमासाठी घेण्यात आलेल्या नीट-२०१८ च्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचा निर्णय सर्वोच्च न्यायालयामार्फत येत्या सोमवारी २३ जुलै रोजी देण्यात येणार आहे.
संबंधित विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेशासाठी दिनांक १३ जून ते १७ जून २०१८ पर्यंत प्रवेश नोंदणी करण्याची परवानगी देण्यात आली होती. या उमेदवारांच्या याचिका प्रलंबित ठेवण्यात आल्या होत्या. या संबंधित अधिक माहिती www.mahacet.org आणि www.dmer.org या संकेतस्थळावर आहे.

Leave a Reply