उद्याचे पंचांग आणि दिनविशेष- सोमवार ३० ऑगस्ट २०२१

सोमवार दिनांक ३० ऑगस्ट २०२१ राष्ट्रीय मिती भाद्रपद- ८ श्री शालिवाहन शके- १९४३ तिथी- श्रावण कृष्णपक्ष अष्टमी ३१ ऑगस्टच्या रात्री ०१ वाजून ५९ मिनिटांपर्यंत नक्षत्र- कृत्तिका सकाळी ६ वाजून ३८…

सोमवार दिनांक ३० ऑगस्ट २०२१
राष्ट्रीय मिती भाद्रपद- ८
श्री शालिवाहन शके- १९४३
तिथी- श्रावण कृष्णपक्ष अष्टमी ३१ ऑगस्टच्या रात्री ०१ वाजून ५९ मिनिटांपर्यंत
नक्षत्र- कृत्तिका सकाळी ६ वाजून ३८ मिनिटांपर्यंत
योग- व्याघात सकाळी ७ वाजून ४४ मिनिटांपर्यंत
करण १- बालव दुपारी १२ वाजून ४२ मिनिटांपर्यंत
करण २- कौलव ३१ ऑगस्टच्या रात्री ०१ वाजून ५९ मिनिटांपर्यंत

चंद्रराशी- वृषभ अहोरात्र

सूर्योदय- सकाळी ०६ वाजून २५ मिनिटांनी तर
सूर्यास्त- सायंकाळी १८ वाजून ५३ मिनिटांनी होईल.

चंद्रास्त- दुपारी १२ वाजून ५९ मिनिटांनी होईल.

ओहोटी- सकाळी १० वाजून ३४ मिनिटांनी आणि रात्री २३ वाजून १० मिनिटांनी
भरती- पहाटे ४ वाजून ५२ मिनिटांनी आणि सायंकाळी १६ वाजून २१ मिनिटांनी

दिनविशेष:-

आज आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी!
जन्माष्टमी म्हणजे गोकुळ अष्टमी, कृष्ण जन्माचा दिवस. श्रावण महिन्यात वद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदिशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे.

इ.स. १२७५ मध्ये श्रावण कृष्ण अष्टमीला आपेगाव-पैठण येथे संत ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म झाला.

ऐतिहासिक दिनविशेष:
३० ऑगस्ट रोजी झालेल्या घटना.

१५७४ साली गुरू रामदास शिखांचे ४थे गुरू बनले.
१९७९ साली सुमारे दहा लाख हायड्रोजन बॉम्ब स्फोटांएवढा ऊर्जेचा हॉवर्ड – कुमेन – मायकेल्स हा धूमकेतू सूर्याच्या पृष्ठभागावर आदळला. असा धूमकेतू आदळण्याची मानवी इतिहासातील ही पहिली नोंद आहे.
१८१३ साली बालसाहित्यिक ना. धों. ताम्हनकर यांचा आणि
१८५० साली प्राच्यविद्या संशोधक, न्यायमूर्ती, कायदेपंडीत, समाजसुधारक काशिनाथ त्र्यंबक तेलंग यांचा जन्म झाला.

You cannot copy content of this page