६० मिनिटांमध्ये १५१ सूर्यनमस्कार- सौ. मुग्धाविरा आणि त्यांची कन्या कु. सानिकाविरा सावंत लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस स्पर्धेत यशस्वी
मुंबई:- मॉडेल टाऊन रेसिडेंटस वेल्फेअर असोसिएशन आयोजित सूर्यनमस्कार शिबिरात ६० मिनिटांमध्ये १५१ सूर्यनमस्कार यशस्वीपणे करून लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस स्पर्धेत सौ. मुग्धाविरा सावंत (वय वर्षे ६०) आणि त्यांची कन्या कु. सानिकाविरा सावंत (वय वर्षे २२) यशस्वी झाल्या. त्यांनी केलेल्या यशस्वी कामगिरीबद्दल सर्वच थरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
सौ. मुग्धाविरा सावंत ह्या योगशास्त्राच्या तज्ञ असून अनेकांना त्या योगा करण्याचे मार्गदर्शन करतात. यापूर्वीही त्यांनी अनेकवेळा सूर्यनमस्काराच्या स्पर्धांमध्ये यश संपादन केले आहे. मातेच्या आणि कन्येच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा!