गोपुरी आश्रमात लेखन कौशल्य निवासी कार्यशाळा- तज्ञांचे मार्गदर्शन

व्यक्तीमत्व विकासाबाबतीतही तज्ञांचे मार्गदर्शन

कणकवली:- गोपुरी आश्रमात ११ आणि १२ ऑगस्ट २०१८ रोजी दोन दिवस १७ ते २४ वयोगटातील ३० युवक व युवतींसाठी `लेखन कौशल्य’ निवासी कार्यशाळा घेण्यात येणार आहे. या कार्यशाळेत प्रतिथयश पत्रकार मा. प्रकाश अकोलकर व नीळू दामले आणि जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अलका गाडगीळ (मुंबई) मार्गदर्शन करणार आहेत.

या कार्यशाळेत सहभागी होणाऱ्या सहभागीनां प्रवेश मोफत असून निवास व भोजनाची मोफत व्यवस्था करण्यात येणार आहे. ज्या युवक युवतीना या कार्यशाळेत सहभागी व्हावयाचे आहे त्यांनी शनिवार दिनांक २८ जुलै २०१८ पर्यंत आपली नावनोंदणी ९४२११४४५३१ या मोबाईलवर मेसेज किंवा whatsapp वर केवळ मेसेज करून नावनोंदणी करायाची आहे.

प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वानुसार पहिल्या ३० युवक- युवतीना प्रवेश दिला जाणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यापुरती ही कार्यशाळा मर्यादित आहे. याचबरोबर व्यक्तीमत्व विकासाबाबतीतही संध्याकाळच्या सत्रात मार्गदर्शन केले जाणार आहे. ज्यांची निवड होईल त्यांना ८ ऑगस्ट रोजी मेसेज अथवा फोन करून कळविण्यात येईल.

ज्यांना या कार्यशाळेत सहभागी व्हावयाचे आहे, त्यांनी आली नावे त्वरीत नोंदवावीत असे आवाहन गोपुरी आश्रमचे अध्यक्ष प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page