मुंबई : महाराष्ट्रातील महिला उद्योजकांना व उद्योग सुरु करु इच्छिणाऱ्या महिलांसाठी उद्योग संचालनालय व वर्ड ट्रेड सेंटर मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय महिला उद्योजकता चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. हे चर्चासत्र बुधवार दि. २७ जून २०१८ ला सकाळी १० वाजता वर्ल्ड ट्रेड सेंटर, तळमजला, सॉऊथ लाउँज,सेंटर-१, कफ परेड, मुंबई येथे होणार आहे.
या चर्चासत्रामध्ये महाराष्ट्र महिला उद्योग धोरण २०१७, यशस्वी महिला उद्योजिकांच्या यशोगाथा, विविध उद्योगाच्या उपलब्ध संधी, ग्रामीण उद्योग, वित्तीय सहाय्य, बाजारपेठ व निर्यात संधी या विषयांवर चर्चा होणार आहे. या चर्चासत्रामध्ये सहभागी होण्यासाठी प्रवेश नि:शुल्क असून पूर्वनोंदणी आवश्यक आहे. ही नोंदणी http://workshop.doattend.com या संकेतस्थळावर करावी.
अधिक माहितीसाठी उद्योग संचालनालय, दुसरा मजला, नवीन प्रशासन भवन, मंत्रालयासमोर, मुंबई-३२, दूरध्वनी : ०२२-२२०२९००९, jtdir.industry@maharashtra.gov.in यावर संपर्क करावा.(‘महान्यूज’)

Leave a Reply to Namrata sawant Cancel reply