संपादकीय- आधुनिक बदल स्वीकारून नेहमीप्रमाणे सहकार्य करा!

सद्गुरूंचा शब्दच श्रद्धावानासाठी कल्याणाचा मार्ग! ॥हरि ॐ॥ ॥श्रीराम॥ ॥अंबज्ञ॥ नाथसंविध् सर्वांसाठी प्रेमपुर्वक हरि ॐ ! सद्गरु कृपेने पाक्षिक ‘स्टार वृत्त’ गेली सोळा वर्षे आपल्या भेटीस येत आहे. सद्गुरूंचा प्रत्येक शब्द…

सद्गुरूंचा शब्दच श्रद्धावानासाठी कल्याणाचा मार्ग!

॥हरि ॐ॥ ॥श्रीराम॥ ॥अंबज्ञ॥
नाथसंविध्

सर्वांसाठी प्रेमपुर्वक हरि ॐ !

सद्गरु कृपेने पाक्षिक ‘स्टार वृत्त’ गेली सोळा वर्षे आपल्या भेटीस येत आहे.

सद्गुरूंचा प्रत्येक शब्द हा श्रद्धावानांसाठी अनमोल असतो. श्रद्धावानांच्या सर्वांगिण विकासासाठी आवश्यक असणारे गुणकारी औषध असते. जीवनात कुठल्याही पातळीवर रोग-आजार येऊच नये म्हणून केलेले लसीकरण असते. एवढेच नाही तर श्रद्धावानाला कुठल्याही प्रकारच्या ‘मृत्यू’पासून मुक्ती देणारा सहज सोपा मार्ग असतो.

सद्गुरूंचा प्रत्येक शब्द हा मंत्रासारखा कार्य करतो, स्तोत्रासारखा प्रभाव दाखवितो आणि अस्त्रासारखा वाईट शक्ती-अशुभ स्पंदनं यांची दुर्दशा करून श्रद्धावानांचे संपूर्ण संरक्षण करतो.

सद्गुरूंच्या शब्दांची महती भारतीय वैदिक सनातन हिन्दु धर्मामध्ये ऋषीमुनीनी, संतानी वारंवार वर्णिली आहे. सद्गुरुंच्या शब्दाचे माहात्म्य हे अखिल विश्वाला व्यापून उरणारे आहे. तेच खरं अंतिम सत्य आहे. सद्गुरुंचे शब्द म्हणजेच श्रद्धावानांवरील सद्गुरुंचे खरंखुरं प्रेम, करुणा, कृपा!

श्रद्धावानांचा नरापासूनचा नारायणापर्यंतचा प्रवास सद्गुरुंच्या शब्दांवरील विश्वासाने सफल संपूर्ण होऊ शकतो आणि सद्गुरुंचे शब्द म्हणजेच परमपूज्य सद्गुरु श्री अनिरुद्धांचे प्रवचनाचे-पितृवचनांचे शब्द-शब्दांकन पाक्षिक ‘स्टार वृत्त’ने देण्याचा प्रयास केला. सद्गुरुंच्या चरणांशी लोटांगण घालताना जो भाव असतो त्याच भावात जाणीवपुर्वक राहण्यात मी मनापासून आनंद मानतो. कारण सोळा वर्षात परमपूज्य सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंनी, परमपूज्य नंदाईने, परमपूज्य सुचितदादांनी भरभरून दिले; वैयक्तिक आयुष्यापासून ते पाक्षिक ‘स्टार वृत्त’ पर्यंत!

एकाच सद्गुरूंचे प्रवचन-पितृवचनाचे शब्दांकन एकाच वृत्तपत्रातून-नियतकालिकेमधून सलग सोळा वर्षे प्रसिद्ध करीत राहणे; हा भौतिक जगतामध्ये विश्वविक्रम आहे. आम्ही सद्गुरुंच्या प्रत्येक पितृवचनावर मनापासून प्रेम केले. त्याचे शब्दांकन करण्याचा प्रयास केला. प्रत्येक शब्दांकनामध्ये काही चूक असल्यास `क्षमा असावी’; ही प्रार्थना केली. सद्गुरूंशी संबधित संस्थांच्या कार्याचा आढावा घेण्याचा प्रयास केला आणि ह्या प्रयासाला आपण सर्वांनी सहकार्य केले.


पत्रकारिता एक पवित्र `व्रत’ पाक्षिक `स्टार वृत्त’ने जपले!

पत्रकारिता हा धंदा-व्यवसाय म्हणून पहिल्या दिवसापासून मानला नाही. पत्रकारिता हे एक पवित्र `व्रत’ आहे असे मानले आणि `व्रत’ पालन केले. वर्तमान पत्र चालविताना आर्थिक बाजू सक्षम असावी लागते. त्यासाठी खूप मोठी कसरत करावी लागते. ती कसरत सद्गुरु कृपेने केली. कोणतीही जाहिरात न घेता आध्यात्मिक पत्रकारितेचा नवीन अविष्कार-नवा अध्याय पाक्षिक `स्टार वृत्त’कडून उदयास आला. आमच्या जन्माचे सार्थक झाले.

प्रत्येक वर्तमानपत्राला आर्थिक समस्या असते. कारण व्यवहारिक भाषेत सांगायचे झाल्यास सात ते आठ रुपये किमंतीची वस्तू तीन चार रूपयाला द्यायची म्हणजेच प्रत्येक वस्तूमागे तीन चार रुपये तोटा सहन करायचा. जेव्हा हजारो प्रती काढल्या जातात तेव्हा हा तोट्याचा आकडा खूप मोठा असतो. हा आर्थिक भार यापुढे कमी करण्यासाठी आधुनिक तंत्राचा वापर करावा लागणार आहे. ‘पाक्षिक स्टार वृत्त’ आपल्या भेटीला यायलाच हवा, ही आमची सद्गुरूकडे प्रार्थना! म्हणूनच पाक्षिक `स्टार वृत्त’ नव्या युगाला साजेसा म्हणून epaper च्या माध्यमातूनही आपल्यासमोर येणार आहे. पाक्षिक स्टार वृत्तचे https://starvrutta.in हे संकेतस्थळ विकसित होत आहे. त्यासाठी श्रद्धावानांपासून-परमात्म्यापर्यंत म्हणजेच त्या एकच सद्गुरू तत्वाकडून कृपाशिर्वाद पाहिजे. म्हणूनच आम्ही प्रार्थना करतोय; `परमात्म्या तुझी करुणा माझ्यापर्यंत येऊ दे. तुझ्या करुणेचा विस्तार वाढव. मी तुझ्या करुणेच्या कक्षेत येण्यास समर्थ नाही. तू श्रद्धावानाच्या कल्याणासाठी काहीही करतोस. करुणेची कक्षाही तुच वाढवून त्या कक्षेत तू मला घेऊ शकतोस!’

मित्रहो, आजपर्यंत आपण सर्वांनी खूप प्रेम दिले. ह्यापुढेही पाक्षिक `स्टार वृत्त’मधील बदल स्वीकारून सहकार्य करावे!

नाथसंविध्

श्री. नरेंद्रसिंह हडकर

Comments

3 responses

  1. Nilesh Kantak Avatar
    1. vijay hadkar Avatar
      vijay hadkar
      1. Rohinivira m. jadhav Avatar
        Rohinivira m. jadhav

Leave a Reply to Nilesh Kantak Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page